गावाचा इतिहास, सण, स्थानिक मंदिरे, वारसा स्थळे, लोककला, संगीत आणि परंपरा इत्यादी माहिती

एकलारी हे महाराष्ट्रातील एक सुंदर व ऐतिहासिक गाव असून, निसर्गसंपन्नता, सुसंस्कृत परंपरा आणि सामाजिक एकतेसाठी प्रसिद्ध आहे. आमचे गाव कृषिप्रधान असून येथे धान , गहू ,हरभरा ,तूळ ,मोहरी ,लाखोरी , भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. गावात शाळा, अंगणवाडी, वाचनालय यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. एकलारी ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध योजनांची अंमलबजावणी करते. ग्रामसभा, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन हे आमच्या कार्याचे ब्रीद आहे. एकलारी हे प्रगतीपथावर असलेले एक प्रेरणादायी गाव आहे, जे आधुनिकतेसोबत परंपराही जपते.